नांदेड - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन अडीच महिने लोटल्यानंतर केंद्र सरकारने पाठवलेले पाहणी पथक म्हणजे नौटंकीच आहे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचे पाप केंद्र व राज्य सरकार मिळुन करत आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुक अहेमद यांनी दिली. ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यांच्या सोबत राज्य प्रवक्ते गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष उत्तर प्रशांत इंगोले, जिल्हाध्यक्ष दक्षिण शिवा नरंगले, महानगर उत्तर अध्यक्ष अयुब खान, महानगर दक्षिण अध्यक्ष विठल गायकवाड व जिल्हा महासचिव श्याम कांबळे उपस्थित होते.
फारुक अहेमद पुढे म्हणाले की, अतिवृष्टीचा फटका राज्यासह मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात बसला असून औरंगाबाद व उस्मानाबाद सहीत संपुर्ण मराठवाडयाला अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले परंतु राज्य सरकारने अत्यल्प भरपाई देऊन तोंडाला पाने पुसली व केंद्राचे पथक फक्त अडीच महिन्यानंतर पाहणीसाठी येत आहे यामुळे दोनीही सरकारे शेतकऱ्यांची मदत न करता थट्टा करीत आहेत हे सिध्द होतेय.
शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करण्यासाठी कर्ज काढून कसेबसे स्वतःला सावरुन पेरणी केलेली आहे. आता केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन काहीही हाती लागणार नाही म्हणून ही पाहणी केवळ नौटंकीच आहे असेही ते म्हणाले.
स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे शरद पवार मेट्रोकारशेड त्या मुद्दावर आजी माजी मुख्यमंत्र्याची बोलुन थेट नरेंद्र मोदीशी चर्चा करुन तात्काळ प्रश्न सोडविण्यासाठी सरसावले तर अडीच महिन्यापासून शरद पवार यांनी शेतीला आपले मुळ सांगणारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मध्यस्थी का केली नाही ? असा सवाल ही त्यांनी समोर आणला.
No comments:
Post a Comment