नवी मुंबई,दि.23:- कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघ, वस्तू व सेवा कर अधिकारी-कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आलेले रक्तदान शिबीर राज्यात अनुकरणीय ठरेल असा विश्वास अतिरीक्त आयुक्त वस्तू व सेवा कर ठाणे झोन सुमेर कुमार काळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज दि.23 डिसेंबर 2020 रोजी कोकण भवन येथील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला भोजन कक्षामध्ये या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराला सुरुवात केली. कोकण भवन व जवळील परिसरातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करून या समाजकार्यात कर्तव्य भावनेने आपला सहभाग नोंदविला.
कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे. करोना व्हायरसविरुद्ध असलेले हे युद्ध जिंकण्यासाठी सर्व यंत्रणा विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत कोकण विभागातील शासकीय कर्मचारी हे नेहमीच पुढे असतात. हे आज या शिबीराच्या आयोजनातून दिसून आले.
या रक्तदान शिबीरात आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. प्रदिप कडू, राज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर), कमलेश नागरे उपायुक्त (वस्तू व सेवाकर), डॉ.नागरगोजे उपायुक्त (वस्तू व सेवाकर), डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (महिती) कोकण विभाग, बी. एस. सोनावणे, सहाय्यक संचालक (आरोग्य), वैद्यकीय अधिकारी (कोकण भवन) डॉ.गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी (डी.वाय.पाटील हॉस्पिटल) डॉ.सीमा गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले. डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या रक्तपेढीने सदर उपक्रमास उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी डी.वाय.पाटील हॉस्पिटल रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्य कर अधिकारी, श्रीम.अश्विनी चौधरी (कोकण विभाग महिला अध्यक्षा) यांनी शिबीराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
No comments:
Post a Comment