शेतकरी संघटनां समन्वय समितीच्या भारत बंदला किनवट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद ;बंद १००टक्के यशस्वी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 December 2020

शेतकरी संघटनां समन्वय समितीच्या भारत बंदला किनवट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद ;बंद १००टक्के यशस्वी



 किनवट ता.८ : शेतकरी विरोधी असलेले तीन शेती कायदे रद्द करा,या प्रमुख मागणीसह अन्य कांही मागण्यांसह आज(ता.८) शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या भारत बंदला शहर व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या काळात शहरातील सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

   बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने शहरातून फेरी काढण्यात आली.फेरीची सुरुवात जिजामाता चौकातून करण्यात आली. फेरी शहरातील प्रमुख मार्गाने फिरत येऊन  फेरीचे विसर्जन जिजामाता चौकात जाहीर सभा घेऊन करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान ,सुरेखा काळे,जनार्धन काळे,स्टँलिन आडे,प्रकाश गब्बा राठोड,व्यंकटराव नेम्मानीवार,बालाजी मुरकुटे पाटील, विनोद भरणे,काँ.गंगारेड्डी बैनमवार, यांची भाषणे झालीत.



  या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना,माकप,भाकप,पीरिपा,या पक्षासह,रास्त भाव दुकानदार संघटना,आँल इंडिया लाँयर्स युनियन,राष्ट्रीय बहुजन रिपब्लिकन संघ,सेक्युलर मुव्हमेंट, यासह अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.यात अनिल क-हाळे पाटील,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,प्रा.किशनराव किनवटकर,शेख चाँद,अभय महाजन,सिराज जिवाणी,जहीरोद्दिन खान,सुनिल राठोड,राहुल नाईक,सूर्यकांत रेड्डी, अब्दुला चाऊस,दिलिप पाटील, शेख शहनाज,शेख अफसर,के.स्वामी,सुरेश घुमरवार,अमरदीप कदम,महेश चव्हाण, मदर चाऊस,,नंदकुमार मोदुकवाड,महेमुद पठाण,ओम आत्राम,माजी नगराध्यक्ष साजिद खान,कपिर रेड्डी, मारोती सुंकलवाड,गिरिष नेम्मानीवार, शाकु बोधी धम्मा, आशिष क-हाळे,सतिष कदम,संतोष डोनगे,सचिन कदम,पप्पू सातपुते यांच्या सह अनेकजण सहभागी झाले होते.



No comments:

Post a Comment

Pages