प्रकल्पस्तरीय नियोजन व मूल्यमापन समितीच्या अध्यक्षपदी आ.भीमराव केराम यांची निवड. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 December 2020

प्रकल्पस्तरीय नियोजन व मूल्यमापन समितीच्या अध्यक्षपदी आ.भीमराव केराम यांची निवड.

 प्रकल्पस्तरीय नियोजन व मूल्यमापन समितीच्या अध्यक्षपदी आ.भीमराव केराम यांची निवड...

किनवट प्रतिनिधी:

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा व प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठीप्रकल्पस्तरीय नियोजन व मूल्यमापन समितीची स्थापना करण्याचे शासन आदेश दिनांक 3 डिसेंबर रोजी आदिवासी विकास विभागाचे सहसचिव भा.र.गावित यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले असून परिपत्रकात नमूद आदेशानुसार किनवट आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाच्या आढावा व नियोजन समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान आमदार भीमराव केरा म यांची निवड करण्यात आली आहे.त्या स्वरूपाचे पत्र दिनांक सात डिसेंबर रोजी किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी निर्गमित केले आहे. मिनी पालकमंत्री दर्जाच्या या समितीवर आमदार भीमराव केराम यांची वर्णी लागल्याने किनवट माहूर तालुक्यातील प्रामुख्याने आदिवासी समाजासह तसेच मतदार संघातिल सर्व स्तरा तिल कार्यकर्त्यात आनंदाला उधाण आले आहे.


आदिवासी उपयोजना प्रकल्प क्षेत्रातील व विशेषता दुर्गम क्षेत्रा साठी राबविन्यात येणाऱ्या विकास योजनाचे सनियंत्रण करण्या करीता मा.मुख्यमंत्री यांनी राज्यातील आदिवासी क्षेत्रातील अतिदुर्गम भागा साठी जाहिर केलेल्या प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा,  शिधा वाटप साठी स्वस्त धान्य दुकाने,आदिवासी पाडया ची महसूली गावे म्हणून जाहिर करणे,रोजगार हमी योजनान्तर्गत आवश्यक कामे मंजूर करून घेण्या संबंधी कार्यवाही करणे, रस्त्याची कामे व आंगनवाडया स्थापन करणे,पिण्याच्या पाण्याची सोय,लघु पाटबंधारा कामे इत्यादी कामे प्रस्तावित करणे त्याचा आढावा घेणे तसेच जिल्हा परिषद व इतर जिल्हा प्रकल्पातील निरनिराळ्या विभागावर कार्यान्वयन अभिकरण द्वारे समन्वय आहे किवा नाही याची खात्री करणे इत्यादी कामाचे नियोजन व आढावा घेण्यासाठीचा या महत्पूर्न समितीवर आमदार भीमराव केराम यांची निवड करण्यात आली आहे.तर या समितीत उपाध्यक्ष म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग,सह या क्षेत्राचे संसद सदस्य,विविध विभागाचे विभाग प्रमुख सदस्य म्हणून राहतील समितीचे सदस्य सचिव म्हणून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांची निवड शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे.एकंदरीत मिनी पालकमंत्री दर्जाच्या या समितीवर आमदार भीमराव केराम यांच्या निवडी मुळे आदिवासी समाजात चैतन्य संचारले असून  ग्रामीण क्षेत्रातील कार्यकर्त्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment

Pages