सरकारने पारित केलेल्या जुलमी कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या भारत बंद ला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा तसेच शिरदवाड गावामध्ये निषेध रॅली आणि गाव कडकडीत बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 December 2020

सरकारने पारित केलेल्या जुलमी कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या भारत बंद ला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा तसेच शिरदवाड गावामध्ये निषेध रॅली आणि गाव कडकडीत बंदकोल्हापूर दि.8-  केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यामध्ये तीन नवे कृषी कायदे संमत केले. कायदे संमत करत असताना विरोधी पक्षाला सोबत न घेता स्वतःच्या बहुमताच्या बळावर त्यांनी हे कायदे करवून घेतले

केंद्र सरकारने पारित केलेले हे जुलमी कृषी कायदे सरळ सरळ शेतकऱ्यांच्या अहिताचे आहेत... ही बाब देशभरातील शेतकऱ्यांच्या ध्यानात येता त्यांनी या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले... आणि म्हणून आज दिनांक 8/12/2020 रोजी भारत बंद ची भूमिका जाहीर केली आणि त्याच धर्तीवर आज शेतकऱ्यांच्या "भारत बंद"ला वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आपल्या शिरदवाड गावामध्ये सुद्धा निषेध रॅली तसेच गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले...आणि शेतकऱ्यांच्या समर्थानात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला...

याप्रसंगी नवे कृषी कायदे हे कंपन्यांची सावकारी निर्माण करणारे असून,शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव सरकार चा आहे,त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध व्हावे असे प्रतिपादन संदीप कांबळे यांनी केले.तसेच "

ज्याप्रमाणे शिक्षणाचे व उद्योगाचे खाजगीकरण व बाजारीकरण केले आहे तसेच शेतीचे देखील करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे असे मत शिरोळ तालुका अध्यक्ष वैभव कांबळे यांनी मांडले, लोकांनी सरकारने चालविलेल्या हुकूमशाही ला बळी पडू नका असे मत दिलीप शिंगे यांनी मांडले,ऍड. बुद्धभूषण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुयश कांबळे शिरदवाड गावचे यांनी आपले मत मांडले... तसेच सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कांबळे, उल्हास कुरणे,चंद्रकांत कांबळे,सागर कांबळे, सुरज माळगे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते, शेवटी आभार प्रदर्शन विश्वजीत कांबळे यांनी करून रॅली ची सांगता केली.No comments:

Post a Comment

Pages