मिल कॉर्नर ते विद्यापीठ गेट येथील रस्त्याचे काम विद्यार्थ्यांनी पाडले बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

मिल कॉर्नर ते विद्यापीठ गेट येथील रस्त्याचे काम विद्यार्थ्यांनी पाडले बंद


औरंगाबाद:

 मिलकॉर्नर ते विद्यापीठ गेट येथील मुख्य रस्त्याचे भर पावसाळ्यात डांबरीकरण करण्यात आल्याने रस्ता उखडला होता वारंवार पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या कडे दुर्लक्ष करत होता आज सदरचा निकृष्ट रस्ता उखडून नव्याने काम करण्याचे आदेश असतांना सुमार दर्जाचे पॅचवर्क काम आज रिपब्लिकन विद्यार्थी सेना,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी व विद्यार्थ्यांनी बंद पाडले आहे.

मिलिंद-नागसेनवन व विद्यापीठ परिसरातील हा रस्ता विद्यार्थ्यांचा मुख्य रस्ता असून ह्या ठिकाणी बोगस काम खपवून घेतले जाणार नसल्याने बोगस काम उखडून नव्याने उत्कृष्ठ काम केल्याशिवाय काम सुरू न करू देण्याचा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक येरेकर यांना निवेदन देऊन काम बंद करण्यात आले.

यावेळी सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,सचिन भुईगळ,ऍड.अतुल कांबळे,राहुल वडमारे,युवक काँग्रेस प्रवक्ते डॉ.निलेश आंबेवाडीकर,खालेद पठाण,विक्रम जगताप,अमित भटकर,देवेंद्र मोरे,आनंद भामरे,शेख लाला,महेंद्र तांबे,आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages