नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा... आढावा बैठकित आ.भीमराव केराम यांची सूचना! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 28 January 2021

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा... आढावा बैठकित आ.भीमराव केराम यांची सूचना!

किनवट प्रतिनिधी:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकरी हिताच्या योजना अंमलबजावणी संदर्भात आज दिनांक २७ जानेवारी रोजी पंचायत समिती किनवट च्या सभागृहात आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत आमदार भीमराव केराम यांनी उक्त विधान केले. 


शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून या योजना प्रकल्पात समाविष्ट गाव,क्षेत्रातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा तसेच त्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचाव्या यासाठी  योजनेच्या कामाचा व अंमलबजावणी विषयक आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची सूचना आ.भीमराव केराम यांनी कृषी विभागाला केली होती.त्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.तपासकर यांनी माहूर आणि किनवट तालुक्याची संयुक्त बैठक किनवट पंचायत समिती सभागृहात आयोजित केली होती.बैठकीला संबोधित करताना आमदार केराम यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा.सर्वच घटकातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अधिका अधिक कसा मिळविता येईल यासाठी कृषी विभागा कडून चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचेही भावना या वेळी केराम यांनी व्यक्त केली.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत माहूर तालुक्यातील १४ व किनवट तालुक्यातील जवळपास तीस गावातील क्षेत्राचा समावेश झालेला आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक,तुषार सिंचनाचा लाभ,फळबाग लागवड योजना,शेततळे,ट्रॅक्टर यंत्रावर आधारित अवजारे,बैलवर आधारित अवजारे यासह इतर शेतकरी हिताच्या योजना शिवाय आता पर्यंत मागासवर्गीयांना सिंचन विहीर योजनेचे लाभ मिळत होते.आता मात्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना देखील सिंचन विहीर योजनेचा लाभ दिला जात आहे.सदैव अस्मानी संकटाचा बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असल्याने शेतकऱ्यांचा कल या योजनेकडे सकारात्मक आहे.योजनेत पारदर्शकता अबाधित राहावी यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची स्पष्टोक्ती आ.केराम यांनी या वेळी दिली.आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.तपासकर तालुका कृषी अधिकारी मुंडे,समूह सहाय्यक,शेतीशाळा प्रशिक्षक यांच्यासह या योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages