मुंबई दि. 21 - स्नॅप ओ कॅब या भारतीय कंपनी द्वारे तयार करण्यात आलेल्या ओ रिक्षा ऍप चे उदघाटन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते आज नवी मुंबईत महापे येथे करण्यात आले. यावेळी स्नॅप ओ कॅब या कंपनी चे मुख्य संचालक सागर कोकास ;प्रदीप अहिरवार; सम्राट सुरवाडे; सौ सई गावडे; अरुण पठारे; सुनील कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
ओ रिक्षा ऍप तर्फे प्रवाश्यांना घराजवळ चांगली विश्वासार्ह रिक्षा सेवा मिळणार आहे तर अनेक बेरोजगारांना रोजगार या ओ रिक्षा ऍप तर्फे मिळणार आहे.मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या योजनांद्वारे भारतीय तरुणांच्या कौशल्याला वाव दिला जात आहे. पाठिंबा दिला जात आहे. ओ रिक्षा ऍप बनविणारे सागर कोकास यांच्या सारख्या तरुण उद्योजकांना ; तरुणांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष तरूणांच्या पाठीशी उभा राहील. ओ रिक्षा आपली रिक्षा समजून सर्वांनी या ओ रिक्षा ऍप चा वापर करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
No comments:
Post a Comment