भाषेला समृद्ध करण्यासाठी मराठीत व्यवहार करा: न्यायमूर्ती जहांगीर पठाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 21 January 2021

भाषेला समृद्ध करण्यासाठी मराठीत व्यवहार करा: न्यायमूर्ती जहांगीर पठाण

 


किनवट, ता. २१( बातमीदार): आता जवळपास सर्वच कामे मराठीत करण्याचे प्रयत्न न्यायालयात होत आहेत.  पुढच्या पिढीला शुद्ध भाषा देण्यासाठी मराठीतच व्यवहार करावा व मराठी भाषा समृद्ध करावी, असे आव्हान दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले आहे.

   तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने आज( ता.२१) न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.

यानिमित्त बोलताना सहदिवाणी न्यायाधीश जयंत जे. एन. जाधव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आता निवाडे हे प्रादेशिक भाषेतून देण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयातही आता जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर होत आहे.

  यावेळी एड. अरविंद चव्हाण व एड. सुभाष ताजणे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक वकील संघाचे सचिव एड. दिलीप काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव अड. राहुल सोनकांबळे यांनी केले.

 यावेळी अड. अनंत वैद्य, अड. यशवंत गजभारे, एड. एन. एच. ठाकूर, एड. टी.आर चव्हाण, एड. पंकज गावंडे एड. अभिजीत वैद्य, एड. नेमानीवार, अड. उदय चव्हाण एड. मिलिंद सरपे यांच्यासह पक्षकार व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a Comment

Pages