कोरोना‘नंतरच्या काळात ‘शाश्वत जिवन‘ धोक्यात मा.कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन ‘आपत्ती व्यवस्थापन‘ कोर्सचा समारोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 20 January 2021

कोरोना‘नंतरच्या काळात ‘शाश्वत जिवन‘ धोक्यात मा.कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन ‘आपत्ती व्यवस्थापन‘ कोर्सचा समारोप

   औरंगाबाद, दि. : ‘कोरोना‘ने मानवी सृष्टीला मोठा धडा दिला असून निसर्गावर मात करण्याची सवय माणसाने सोडून दिली पाहिजे. ‘न्यू नॉर्मल‘ काळात ‘शाश्वत विकास‘ याहीपेक्षा शाश्वत जीवन धोक्यात आले असून नवीन जीवनशैली विकसीत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘एमजीएम‘ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केले.


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास वेंâद्रात ‘आपत्ती व्यवस्थापन‘ कोर्सचा समारोप ‘एमजीएम‘ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.१५) दुपारी ३ वाजता समारोप झाला. मनुष्यबळ विकास वेंâद्रात १ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान हा कोर्स घेण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.पुâलचंद सलामपुरे, कोर्स समन्वयक डॉ.राम चव्हाण, वेंâद्राचे संचालक डॉ.एन.एन.बंदेला, सहसंचालक  डॉ.मोहम्मद अब्दुल रापेâ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगातर्पेâ शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन, लिंग भावात्मक अभ्यास, माहिती तंत्रज्ञान सह महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. अलिकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तीबदलही तांत्रिक ज्ञान देणे गरजेचे बनले आहे. ‘कोरोना‘ने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक बदल केले आहेत. याची जाणीव ठेऊन सर्वांनी काम करावे, असेही डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ.एन.एन.बंदेला यांनी ‘नैसर्गिक आपत्ती व पर्यावरण‘ याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.मोहम्मद अब्दुल रापेâ यांनी सूत्रसंचालन तर डॉ.अनिकेत सरकटे यांनी आभार मानले.

    मान्यवरांचे मार्गदर्शन

     कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे यांनी मार्गदर्शन केले. तर १५ दिवसात डॉ.बबन इंगोले, डॉ.संजय चाकने, डॉ.तुषार प्रधान, डॉ.अतुल साळुंके, डॉ.मधुकर शेंबडे, डॉ.भास्कर इडगे, डॉ.संभाजी शिंदे, डॉ.एस.टी.गायकवाड, डॉ.आर.एम.दमगीर, डॉ.पानसकर, प्राचार्य दिलीप गौर, डॉ.कारभारी काळे, एस.जी.शिंदे, डॉ.सुभाष बेहरे, डॉ.सतीश पाटील, डॉ.अतुल पारगांवकर, बाळासाहेब कच्छवे, ओंकार नवभीहारकर, डॉ.चंद्रशेखर हिवरे, डॉ.भास्कर साठे आदी मान्यवर मार्गदर्शन केले. या कोर्ससाठी अर्चना येळीकर, अमोल मदन, राजु कणसे, अस्मिता जोंधळे आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Pages