वडोदरा दि. 20 - अस्पृश्यतेच्या दलदलीत गुलामीत पिचलेल्या दबलेल्या दलित समाजाला बाहेर काढण्याचा दलित मुक्तीचा मानवमुक्तीचा संकल्प महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गुजरात च्या वडोदरा येथील सयाजी गार्डन मधील ज्या झाडा खाली केला त्या ऐतिहासिक संकल्पभूमीला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भेट दिली.त्यावेळी महमानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील व्यापक प्रबळ रिपब्लिकन पक्ष आपण साकार करू असा ना.रामदास आठवले यांनी संकल्प केला. दलितांना न्याय देतानाच दलित सवर्ण यांच्यात एकजूट निर्माण करण्याचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष देशात मजबूत उभा करण्याचा आपला संकल्प असल्याचा निर्धार ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
आज ना रामदास आठवले हे गुजरात दौऱ्यावर आले असून त्यांनी अहमदाबाद वडोदरा आणि सुरत येथील सभांना भेटी दिल्या.
वडोदरा महापालिकेच्या निवडणुकीची रिपब्लिकन पक्षाने केलेल्या तयारी चा आढावा घेण्यासाठी वडोदरा येथे झालेल्या बैठीकिला ना रामदास आठवले यांनी संबोधित केले.
वडोदरा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने युती करण्याचा प्रस्ताव भाजप ला पाठविला आहे.त्यात रिपब्लिकन पक्षाला वडोदरा महापालिका निवडणुकीत किमान 24 प्रभाग सोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वडोदरा मनपाच्या प्रभाग क्र 76 मधील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी रिपाइं चे राजेश गोयल आणि शैलेश शुक्ल उपस्थित होते.
No comments:
Post a Comment