‘कल्चरल'च्या वतीने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आदरांजली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 20 January 2021

‘कल्चरल'च्या वतीने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आदरांजली

 नांदेड :सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी नुकतेच मुंबईत झाले. कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित आदरांजली सभेत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी 'कल्चरल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर अध्यक्षस्थानी होते. 

  ‘बहुमुखी प्रतिभा असलेले गुलाम मुस्तफा खान यांनी लता मंगेशकर, ए. आर. रेहमान, आशा भोसले, हरिहरन, सोनू निगम असे उत्तुंग शिष्य घडविले. आपल्या शास्त्रीय संगीत व  लोकसंगीताने लहान-थोर साऱ्यांना त्यांनी सदैव मंत्रमुग्ध केले. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांचे असणारे योगदान हा आपला समृद्ध सांस्कृतिक वारसाच म्हटला पाहिजे. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतातील कोहिनूर हरपला आहे’, अशी भावना डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी  यावेळी व्यक्त केली. कल्चरल असोसिएशनचे सचिव डॉ. विजयकुमार माहुरे म्हणाले, ‘न्या.प्रकाश राहुले(आदम) यांच्याशी असणाऱ्या स्नेहातून  'कल्चरल'च्या वतीने १४ सप्टेंबर २०१० रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुलाम मुस्तफा खान आले होते.  त्यांचे येणे हा  कल्चरल असोसिएशनचा त्यांनी  केलेला सन्मानच होता.  त्यांच्या गायनाने नांदेडकरांना भुरळ पाडली होती. भारतीय शास्त्रीय संगीताचे ते आधारवड तर होतेच पण हे माणूस म्हणूनही गुलाम मुस्तफा खान खूप मोठे होते.’

सभेचे सुत्रसंचालन  मारोतराव धतुरे यांनी केले तर प्राचार्य विकास कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कोषाध्यक्ष प्रदीप दांडगे, रामदास होटकर,डी. डी. भालेराव, अरूणाताई नरवाडे, विमल नवसागरे, मंदाकिनी माहुरे, विमल शेंडे, सदाशिव गच्चे, नंदन नांगरे, एस. जे. शिरसे, बाबाराव नरवाडे, मधुकर गच्चे, भीमराव हाटकर,शिवाजी सोनकांबळे, डॉ. मालोजी पाळेकर,जगन गोणारकर आदी मान्यवर उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages