भिमशक्ती सामाजिक संघटना चे पँनल बहूमताने विजयी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 19 January 2021

भिमशक्ती सामाजिक संघटना चे पँनल बहूमताने विजयी

 


नांदेड; महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवली जात नाही पण ग्रामपंचायतींमध्ये मोठे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अनेक नेते, वेगवेगळे पक्ष स्वत:च्या विजयाचा दावा करत होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १२ हजार ७११ जागांसाठी मतमोजणी झाली. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलं असून सर्वच पक्षांनी या आघाड्यांवर आपला दावा केला, ह्यामध्ये भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने 'लोकसेवा पैनल पिंपरी महिपाल' या गावी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले होते.

या निवडणुकी मधील ९ उमेदवारांपैकी ६ उमेदवार स्पष्ट बहुमताने निवडून आले. बहूमत मिळाल्यामुळे जिल्हाभर भिमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदउत्सव साजरा केला, त्यामुळे संघटनेची वाढ होऊन समाज हिताय जास्त काम करण्यासाठी संघटना सज्ज होऊन मजबूत होईल, असे भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांत भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे.

लोकसेवा पॅनलचे विजयी उमेदवार कमलेश भगवानराव कदम, देवयानी गिरधारी जोगदंड, किशोर बालाजी पोहरे, अलकाबाई हनुमंत चंदेल, आरती उत्तम पोहरे, रमाबाई भिमराव खिल्लारे हे विजय झाले आहेत.

लोकसेवा पॅनलच्या या घवघवीत यशाबद्दल भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा.सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे, जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांतजी भोकरे, नांदेड तालुकाध्यक्ष मा.सुखदेवजी भिसे, भिमशक्ती युवानेते इंजि.मा प्रदिपभाऊ भोकरे आणि समस्त भिमशक्ती सामाजिक संघटना तसेच युवा आघाडी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडणूकीत रजनीकांत भिसे. नामदेव पोहरे, माणिक चंदेल व साहेबराव पंडगे. प्रभु घाटे, राजपाल गच्चे, स्वप्नील उकंडे, विजय उकडे, देविदास धाबे, शिवाजी गच्चे आदीनी विजयासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages