नवीन नेतृत्व घडवणारी निवडणूक - विवेक घोटाळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 19 January 2021

नवीन नेतृत्व घडवणारी निवडणूक - विवेक घोटाळे

स्थानिक  स्वराज्य संस्थांची निवडणूक ही नवीन नेतृत्व घडवणारी असते. ग्रामपंचायतींना आता थेट आर्थिक निधी मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या तुलनेने ग्राम पंचायत निवडणुकीस महत्व आलेले दिसते. त्यामुळेच तिथे स्पर्धा वाढलेली दिसते. यावेळच्या निवडणुकांवर कोरोनाचे सावट होते. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा एक परिणाम असाही झाला कि शहरातील तरुण अधिक कालावधीसाठी आपल्या मूळ गावी थांबला. आणि गावाच्या राजकारणात उतरला. असंख्य गावातून यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत शहरी तरुण [मूळचे ग्रामीण पार्श्वभूमी असलेले व शिक्षण - रोजगाराच्या निमित्तानं शहरात आलेले तरुण ] मोठ्या संख्येने विजयी झालेत. त्यातील अनेकजन प्रस्थापित गटाकडून निवडून आले तर काही तरुण नवीन पॅनेल प्रस्थापितांविरुध्द उतरवून विजय मिळविला आहे. आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे काही विद्यार्थी चळवळीतील तरुणही यशस्वी झालेत. राजकीय पार्श्वभूमी नसलेले,पैसा नसलेले तरुण निवडून आले आहेत.


आकाश दौंड. आपली लढाई केवळ भाकरीसाठी नसून स्वाभिमानासाठी आहे म्हणणारा आकाश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता लोकबळावर विजयी झाला. मुन्ना आरडेचेही असेच उदाहरण. धम्मानंद सोनकांबळे, दीपक सदर, पूजा चोरमारे, नागसेन जिगळेकर हे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे तरुण यशस्वी झाले.


व्यवस्थेला नुसत्या शिव्या घालून व्यवस्था बदलत नाही. तर व्यवस्था बदलायची असेल तर आत जाऊन सुरुंग पेरावे लागतात, असे आक्रमकपणे भूमिका घेणाऱ्या सुषमाताई अंधारे यांच्या गणराज्यसंघानेही रमाबाई सुर्यवंशी व इतरांच्या रुपाने निवडणूक राजकारणात यश मिळविले. अली मालेगावकर. पुण्यात कंत्राटी प्राध्यापक. त्याने गावात सामाजिक कार्यातून नेटवर्क तयार केले. त्याने स्वतंत्र पॅनेल ऊभारुन प्रस्थापितासमोर आव्हान उभारले. क्रांती पाटील असात विद्यार्थी चळवळीतील नेता. गावातील पॅनेलला दिशा दिली. तर संजय भोईवार यांनी मुंबईतील चांगली  नौकरी सोडून ग्राम विकासासाठी निवडणूक लढविली व जिंकली. भिक्षेकरी डवरी गोसावी समाजातून सुरेखा इंगवले, लेखक - कवी आनंद विंगकर यशस्वी झाले.


अंजली पाटीलही सुरुवातीला चर्चेत आल्या. तृतीयपंथी म्हणून त्यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयीन लढाईच नव्हे तर त्यांनी भादली बु. जि. जळगाव मधून ग्रामपंचायत निवडणुकही  जिंकली. संसदिय लोकशाहीने हे शक्य केले.


नवीन नेतृत्व असो किंवा राजकीय बदल असो हे निवडणूक मार्गाने होतात. प्रस्थापित नेतृत्वाला अनेक ठिकाणी आव्हान निर्माण झाले ते नवीन नेतृत्वामुळे. त्यातील अनेकांना सत्ता मिळणार नसली तरी प्रभावी दबाव गट म्हणून त्यांना काम करता येणार आहे.


- विवेक घोटाळे

No comments:

Post a Comment

Pages