यवतमाळ : जिल्ह्यातील, तालुका दारव्हा अंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती अखिल भारतीय समता सैनिक दलाद्वारे (All-India Samata Sainik Dal) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कु. आयेशा मनवर, कु. नेहा धवणे, कु. कल्याणी मनवर या मुलींनी, सावित्रीबाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला व त्यांच्या शिकवणीप्रमाणे महिलांनी कार्यप्रवण राहावे असे मनोगत व्यक्त केले. तसेच आयु. प्रशीक आनंद आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणालेत की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी लढलेल्या स्त्रीमुक्तीच्या लढ्याची धार कदापिही कमी होऊ देता कामा नये. यास्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीसाठी आखून दिलेली तत्वे, धोरण व कार्यक्रम यांस समाजात रुजवून समता प्रस्थापित करण्यासाठी व संविधानाच्या रक्षणार्थ समतेच्या सैनिकांनी सदोदित कर्तव्यतत्पर असले पाहिजे व अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी कंबर कसूनच तयारीत असले पाहिजे. एवढेच नव्हे तर आपल्या दलाची शक्ती वृद्धिंगत करण्यासाठीही धडपडले पाहिजे. देशात घडणाऱ्या सामाजिक-आर्थिक-राजकीय घडामोडींचा अभ्यास करण्यात व त्यात आपला हक्काचा समान वाटा घेण्यात महिलांनी मागे राहता कामा नये असेही ते म्हणाले. तद्नंतर आयु. अशोक इंगोले यांनी आपल्या भाषणातून, यवतमाळ जिल्ह्यात अधिकाधिक समता सैनिक दलाची बांधणी करण्यासाठी आपण कार्यप्रवण राहू असे कळविले. आयु. उज्वला इंगोले (सचिव, महाराष्ट्र राज्य, महिला शाखा) यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून महिला वर्गाने प्रेरणा घेऊन महिला सशक्तीकरण करण्यासाठी समता सैनिक दलात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढवावा लागेल असे विचार मांडले. आयु.भीमराव मनवर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आयु. गोपाल खाडे यांनी संचलन केले तर आयु. कल्पना डापसे यांनी आभार प्रदर्शन केले. जेष्ठ कार्यकर्त्या आयु. द्वारकाबाई मनवर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आयु. रंजना भगत, आयु. कुसुमताई मनवर, आयु. अनुलिका मनवर, आयु. माया भुसारे व इतरही कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Monday, 4 January 2021

Home
प्रादेशिक
अखिल भारतीय समता सैनिक दलाद्वारे (AISSD) यवतमाळ जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
अखिल भारतीय समता सैनिक दलाद्वारे (AISSD) यवतमाळ जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Tags
# प्रादेशिक
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
प्रादेशिक
Labels:
प्रादेशिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment