बी डी नानावटे ह्यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 5 January 2021

बी डी नानावटे ह्यांचे निधन



नागपुर : 

कांशीरामजी ह्यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी बी डी नानावटे (बाबूजी) नागपूर ह्यांचे वयाच्या 79 व्या वर्षी आज (5 जानेवारी) निधन झाले. 


नानावटे हे जीवनविमा मध्ये अधिकारी या पदावर असतांना बामसेफ च्या माध्यमातून ते कांशीरामजींच्या सानिध्यात आले, त्यांनी मा कांशीरामजी ह्यांनी डिक्टेत केल्यानुसार बामसेफ परिचय व चमचा एज या पस्तकांचे लघुलेखन करण्याचे कार्य केले. दिल्लीहुन 1979 ला निघालेल्या ऑपरेस्ट इंडियन या इंग्रजी मासीकाचे संपादन व लेखनही केले. तसेच बहुजन टाइम्स या इंग्रजी दैनिकाचे ही काम सांभाळले.


दक्षिण नागपुरात कांशीरामजींनी भानुदास नानावटे ह्यांच्या चंद्रमनी नगरातील निवासस्थानीच 1979 ला ब्रदरहूड सेंटर सुरु केले होते.

नानावटे हे अत्यंत विद्वान व मनमिळवू होते, त्यांच्या मागे पत्नी शकुन, मुलगा आनंद, प्रवीण व 2 मुली असून बामसेफ, व बसपा चा मोठा आप्त परिवार आहे. या चळवळीतील ते माझे गुरु असून त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकलो, त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीची बौद्धिक हानी झाली.



No comments:

Post a Comment

Pages