मांडवी प्रतिनिधी (इंद्रापाल कांबळे):
आज मांडवी येथील स्टेट बँकेत शेतकरी अरुण आळणे यांनी पीक कर्ज वेळेवर का देत नाही म्हणून फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मागील पाच ते सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची फाईल अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक वेळा बँकेला विचारणा केली असता सविस्तर माहिती काही मिळत नसल्यामुळे आज शेवटी वैतागून आरून आळणे यांनी बँकेच्या फील्ड ऑफिसर यांच्या टेबलावरती असलेल्या पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
या वेळी उपस्थित पोलिस उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे व विजय कोळी, बँकेचे सुरक्षा रक्षक यांनी त्याना उत विण्याचे प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँक चे बाहेर उपस्थित शेतकरी व बँक कर्मचारी हे आवक झाले.
सायंकाळी चार वाजता पर्यंत बँकेच्या बाहेर अनेक शेतकऱ्यांरी उभ्या असतानाही अधिकारी हे नेट नाही या कारणास्तव एकही अर्ज पास होत नाही असे कारण सागत होते
मागील अनेक महिन्यांपासून पीक कर्ज चे अर्ज हे बँकेत देत आहे त्यापैकी करुणा आरून आळणे यांच्या फायलीवर सही पण झालेली आहे पण पैसे मिळत नाही यांचे शेत हे कणकी शिवारात आसून हे परिसर मांडवी बँक च्या हदित येत असून त्यांनी या बँकेत पीक कर्ज ची फाहील देऊन अनेक वेळा भेट दिली असता बँकेतून सविस्तर माहिती मिळत नाही हे लोक व्यवस्थित बोलत पण नाही नेट नाही हे कारण देऊन बाजूला बसतात बँकेच्या कमासाठी शेतकरी येथे रोज ये-जा करत असतात त्यांच्या कामे बुडतात पण बँकेच्या कर्मचारी माहिती सुद्धा देत नाही यामुळे या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी व शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी फाशी घेत्या शिवा पयाय नाही त्यामुळे मला असे करावे लागत आहे
किनवत चे माजी नगराध्यक्ष व शेतकरी यांनी सांगितले.
"मांडवी चे बँकेचे फिल्ड ऑफिसर यांनी असे सांगितले की मांडवी स्टेट बँकेला इंटरनेट कनेक्टिव्हिटी बीएसएनएल यांचे असून ती सतत बंद असते त्यामुळे बँकेच्या नाईलाज आहे आतापर्यंत दोनशे शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे प्रलंबित असून येत्या पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येईल एकही शेतकरी कर्ज पासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले आहे"
No comments:
Post a Comment