दलित सवर्ण एकजुटीने देशाचा विकास वेगाने होईल- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले भीमा कोरेगाव इतिहासाची शालेय पाठयपुस्तकात समावेश करण्याची केली मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 January 2021

दलित सवर्ण एकजुटीने देशाचा विकास वेगाने होईल- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले भीमा कोरेगाव इतिहासाची शालेय पाठयपुस्तकात समावेश करण्याची केली मागणी

पुणे दि.1-  देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे.  दलित आणि सवर्ण यांच्यात एकजूट  झाल्यास देशाचा वेगाने विकास होईल असे सांगत भीमा कोरेगाव च्या लढाईचा इतिहास शालेय अभयसक्रमाच्या पाठयपुस्तकात  समाविष्ट करावा. या मागणीसाठी आपण शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.  

भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार मध्यमांशी ना रामदास आठवले बोलत होते.  

 भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाच्या परिसराचा विकास करण्याचा आराखडा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता त्यानुसार या परिसराचा विकास करावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे हाच आमचा संकल्प असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष ; रिपब्लिकन पक्ष या अर्थाने मी रिपब्लिकन ही आमची घोषणा आहे असे ना. रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.यावेळी रिपाइं चे परशुराम वाडेकर; आसित गांगुर्डे; सूर्यकांत वाघमारे; डॉ. सिद्धार्थ धेंडे; आयुब शेख ;शैलेश चव्हाण;संघमित्रा गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


             

No comments:

Post a Comment

Pages