प्रतिनिधी नांदेड-18-01-2021
आजाद समाज पार्टी महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजासेना संघटना प्रमूख अरूणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांनी आझाद समाज पार्टीत जाहीर प्रवेश करून संसदीय राजकीय वाटचालीस सुरूवात केली आहे.
अरूणकुमार सुर्यवंशी हे राहुल प्रधान यांचे जुने सहकारी मित्र आहेत.राहुल प्रधान अध्यक्ष असलेल्या युवा पँथर संघटनेत ते मागच्या चार वर्षा पासून एकत्र आंबेडकरी चळवळीत काम करीत होते. राहुल प्रधान यांनी 2020 मध्ये राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षात प्रवेश करित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन आंबेडकरी तरूणांच राजकारण उभ करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
याच भुमिकेच समर्थन करीत राहुल प्रधान यांचे अत्यंत विश्वासु व कट्टर समर्थक समजल्या जाणारे अरूणकुमार सुर्यवंशी यांनी स्वतः संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रजासेना संघटनेच्या महत्वाच्या सहका-यांसह राहुल प्रधान यांच्या नेतृत्वात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पक्षप्रवेश केला.
या प्रवेशाच्या निमीत्ताने नांदेड जिल्हयात नवीन यशस्वी आंबेडकरी राजकारण उभ टाकेल अशा चर्चा जिल्हाभरात घडुन येताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment