जोपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जागा वाढवणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण!' -नसोसवायएफ चा एल्गार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 18 January 2021

जोपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जागा वाढवणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण!' -नसोसवायएफ चा एल्गार

नांदेड; नँशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट(नसोसवायएफ) ने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जागा वाढवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड चे कुलगुरु यांच्याकडे मागणी केली आहे पण मा. कुलगुरू व विद्यापीठ संघटनेच्या मागणी कडे दुर्लक्ष केले असल्याने  संघटना विद्यार्थी हिताय या मागणी साठी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन मा. कुलगुरूंना  संघटनेचे  पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.


स्वा.रा.ति.मराठावाडा विद्यापीठ,नांदेड मध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षी पदवी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या दर वर्षी पेक्षा आधिक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमा ला अपुऱ्या जागा असल्यामुळे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत, नसोसवायएफ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या म्हणजे एम.ए. एम.काँम.एम.एस्सी. एम.एस.डब्ल्यु व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमा च्या  जागा वाढवण्याची मांगणी करत आहे. पण ह्या कडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत आहे.तर दुसरी कडे विद्यार्थी आपल्या भविष्य बाबात बेचन होत आहे. स्वा.रा.ति.मराठवाडा विद्यापीठाची स्थापना हि नांदेड,लातूर,परभणी,हिगोली या अविकसित व दुष्काळीत भागातीला विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. विद्यापीठाचा केंद्र बिंदू विद्यार्थी आहे आज हा  केंद्र बिंदू उच्च शिक्षणा पासून वंचित राहत आहे.या साठी विद्यापीठ कुठलीच भूमिका घेत नाही.

   विद्यार्थ्यांच्या हिताय विद्यापीठ उदासीन आहे आणि हे विद्यापीठ प्रशासन जर पदव्युत्तर अभ्यासक्रमा पासून या चार जिल्ह्यातील विद्यार्थी ना वंचित ठेवत असेल तर संघटना याचे उत्तर आपल्या आंदोलनातून देइल, शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षामधील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यींची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात आहे.  या विद्यार्थ्यंच्या पूढील शिक्षणाची व्यवस्था करावी  या हेतूने संघटने कडून विद्यापीठ प्रशासनाला व मा. कुलगूरूंना वारंवार मागणी केली पण प्रशासन विद्यार्थी केंद्र बिंदू म्हणून ह्या कडे कानाडोळा करत आहे.म्हणून नसोसवायएफ २३ जानेवारी पासून विद्यापीठाच्या गेठ समोर बेमूद्दत अमरण उपोषण करणार आहे.अशी माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सतिश वागरे यांनी कळवली आहे.

No comments:

Post a Comment

Pages