पुण्यातील भिडेवाड्याच राष्ट्रीय स्मारक व्हावं या मागणीसाठी आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 1 January 2021

पुण्यातील भिडेवाड्याच राष्ट्रीय स्मारक व्हावं या मागणीसाठी आंदोलन

पुणे :

 पुण्यातल्या भिडेवाड्याचं स्मारकात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अभिव्यक्ती, काफिला आणि इतर संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1948 रोजी भिडेवाडा इथं मुलींची पाहिली शाळा सुरू केली होती. त्या दिवसाचं औचित्य साधून सावित्रीबाईंच्या कार्याला अभिवादन करण्यात आलं आणि स्मारकासाठी आंदोलन करण्यात आलं.


सावित्रीबाई फुले व जोतीबांनी १जानेवारी १८४८ साली पुण्यातील भिडेवाडा येथे देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करुन नववर्षीदिनी एका नवयुगाची सुरुवात केली. यानिमित्ताने भिडेवाड्याला भेट देऊन अंगमेहनती कष्टकरी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सावित्री-जोतीच्या महान कार्याला अभिवादन केले व भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणीही केली. 



No comments:

Post a Comment

Pages