भारतीय बौद्ध महासभेचे पी. आर धुळे यांचे निधन.. आज अंत्यसंस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 January 2021

भारतीय बौद्ध महासभेचे पी. आर धुळे यांचे निधन.. आज अंत्यसंस्कार

 नांदेड,- येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष पी. आर. धुळे सर यांचे आज दीर्घ आजारानंतर निधन झाले. आज (दि.२) दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पी. आर. धुळे सर हे नांदेडच्या सायन्स आणि पीपल्स महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Pages