किनवट, ता.१८: तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रीया आज (त.१८) शांततेत पार पडली. बोधडी (खुर्द) येथेेेे ग्रामविकास पॅनलने ११ पैकी १० जागा पटकाऊन स्पष्ट बहूमत मिळवले. शांततेत मतदान पार पाडण्यात निवडणूक विभाग व पोलीस यंत्रणेला यश मिळाले. गोंडेमहागांव आणि फुलेनगर या दोन ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. २४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रीया पार पडली असून २२ हजार ५२८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली.
बोधडी बु. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर दहिफळे यांच्या व भाजपाचे बाबुराव केंद्रे यांच्या ग्रामविकास पँनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. बाबूराव केंद्रे यांच्या पॅनलने चक्क ११ पैकी १० जागांवर ताबा मिळवला. उपसरपंच प्रल्हाद मुंडे यांच्या पॅनलचा चक्क धुव्वा उडाल्याचे दिसते.
लिंगी ग्रामपंचायतीवर ९ पैकी ८ जागा मिळऊन भाजपाचे पॅनल प्रमूख बजरंग रेड्डी यांनी वर्चस्व दाखऊन दिले. मदनापूर (सोमेश्वरमंदीर) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पॅनालने ७ पैकी ४ जागा मिळऊन स्पष्ट बहूमत मिळवले आहे. मलकापूर (खेरडा) ग्रामपंचायतीवर भाजपा देवराव नैताम पॅनालने ९ पैकी ९ जागा जिंकल्या आहेत. मलकवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनाल प्रमूख गोविंद धुर्वे यांनी ७ पैकी ५ जागा मिळऊन विरोधकांना धक्का दिला आहे. दहेगांव (चिखली) गटग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर चव्हाण यांनी ९ पैकी ६ जागा घेऊन स्पष्ट बहूमत मिळवले असून भाजपाला ३ जागेवरच समाधान माणावे लागले. कोसमेट ग्रामपंचायतीवर भाजपाचे कपील बंकलवाड यांच्या पॅनालने सर्वच्यासर्व जागांवर स्पष्ट बहूमत मिळऊन एकहाती सत्ता मिळवली आहे. रिठा ग्रामपंचायतीवर काँ.विजय जाधव यांच्या पॅनालने ९ पैकी ७ जागा मिळऊन लालबावट्याकडे सत्ता खेचून आणली आहे.. इस्लापूर ग्रामपंचायतीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडी पॅनल प्रमूख डाॅ.गंगासागर यांच्या पॅनालने १५ पैकी १२ जागा मिळऊन विरोधकांना जबरदस्त धक्का दिला. भाजपाने केवळ ३ जागा जिंकल्या हे विशेष. शिवणी ग्रामपंचायतीवर ५ जागा बिनविरोध निघाल्या तर ६ जांगावर निवडणूक झाली होती.
सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारोती थोरात, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किणगे व सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
- मिलिंद सर्पे
No comments:
Post a Comment