अनु.जाती संशोधन फेलोशिपमधील जाचक अटी रद्द करून जाहिरात त्वरित काढण्यात यावी--नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 18 January 2021

अनु.जाती संशोधन फेलोशिपमधील जाचक अटी रद्द करून जाहिरात त्वरित काढण्यात यावी--नसोसवायएफ


 

नांदेड: उच्य शिक्षणातील संशोधनास चालना देण्यासाठी 2009 मध्ये राजीव गांधी नॅशनल फेलोशिप ही अनु.जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली होती.दरम्यान 2016 मध्ये या फेलोशिप चे नाव बदलून राष्ट्रीय अनु.जाती संशोधक विद्यार्थी फेलोशिप असे नामकरण करण्यात आले.  तेव्हापासून फेलोशिपची जाहिरात काढण्यात आली नाही. त्यामुळे  हा प्रकार म्हणजे अनुसूचित जातीच्या एम.फिल व पीएचडी विद्यार्थ्यांना संशोधनापासून रोखण्याचे हे कारस्थान असून यातील जाचक अटी रद्द करून सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिफ लागू करून याची जाहिरात त्वरित काढण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना नसोसवायफ कडून निवेदन देण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा आज कामगार मेळाव्या निमित्त नांदेड दौरा होता. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथिल भेटीदरम्यान नसोसवायएफ या संघटनेकडून उच्य शिक्षणातील आजच्या अडचणी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक संकटांना तोंड देत संशोधन करावे लागत आहे.हा प्रकार म्हणजे संशोधनावर गडांतर आणून अनुसूचित विद्यार्थ्यांना यातून दूर करणे होय.यातील जाचक अटी रद्द करून देशभरातील अनु.जातीच्या एम.फील व पी.एच.डी च्या संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली दरम्यान राष्ट्रीय अनु.जाती संशोधक फेलोशिप सर्व एम.फील व पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांना प्राप्त करून द्यावी.तसेच नेट उत्तीर्ण ही पात्रता काढून टाकन्यात यावी.राष्ट्रीय अनु.जाती संशोधक विद्यार्थी फेलोशिप 2019-20 ची  जाहिरात ही फेब्रुवारी अखेर पर्यंत त्वरित काढण्यात यावी.या मुख्य मागणीसाठी नॅशनल एसी एसटी ओबीसी स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट चे  जिल्हा शिष्टमंडळ नामदार आठवले यांना भेटले .यावेळी नसोसवायएफचे राज्य प्रवक्ता प्रा.सतिश वागरे,जिल्हा सचिव अक्षय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष सुजय पाटील, जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम दिग्रस्कर आदी उपस्थित होते.


   



                                                                                

                                                             

                                                       

                                                       

No comments:

Post a Comment

Pages