डाॅ अांबेडकर टीचर्स असोसिएशने घेतली कुलगुरूंची भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 January 2021

डाॅ अांबेडकर टीचर्स असोसिएशने घेतली कुलगुरूंची भेट

 


औरंगाबाद : डाॅ अांबेडकर टीचर्स असोसिएशनच्या वतीने "ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स"या संदर्भात व संगीत विषयात पेट परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांसह प्राध्यापक मंडळी यांनी कुलगुरूंची भेट घेतली .कुलगुरू येवले यांनी अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची चर्चा करून सगळ्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स या संदर्भात लवकरात लवकर हा कोर्स सुरू करण्यात येईल व यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप ठेवला जाणार नाही.असेही प्रशासनाने सांगितले. प्रशासनाच्या कामामध्ये कोणतीही ढवळाढवळ करू नये व कोणीही स्वतःकडे या गोष्टीचे क्रेडीट ओढण्यासाठी राजकारण करू नये अशी आशा व्यक्त केली.हा कोर्स सुरू करण्यासाठी कुणाच्याही एनओसीची गरज नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले .तसेच एका महिन्याच्या आत संगीत विषयांमध्ये रिसर्च सेंटर निर्माण करून पेट घेण्यात येईल असे सांगितले .याप्रसंगी प्रा.डॉ किशोर वाघ, डॉ अरुण शिरसाठ, प्रा.डॉ धनंजय रायबोले ,डॉ भगवान गव्हाळे, प्रा. डॉ.यूवराज धबडगे,  प्रा. डॉ अरुण कोळी ,प्रा.डॉ बाळासाहेब लिहिणार,अजय देहाडे, योगेश गच्छे, चारुशीला डोंगरे ,यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते  .No comments:

Post a Comment

Pages