डॉ.सुखदेव थोरात समिती आज औरंगाबादेत -महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा समिती संवाद साधणार - मराठवाडयातील दोन्ही विद्यापीठांच्या प्रतिनिधी उपस्थित राहणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 January 2021

डॉ.सुखदेव थोरात समिती आज औरंगाबादेत -महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा समिती संवाद साधणार - मराठवाडयातील दोन्ही विद्यापीठांच्या प्रतिनिधी उपस्थित राहणार

   औरंगाबाद, दि.२३ :     महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, कायदा (अधिनियम) २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी गठित डॉ.सुखदेव थोरात समिती शनिवारी (दि.२३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार आहे. यावेळी मराठवाडयातील दोन्ही अकृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.


    विद्यापीठाच्या नाटयगृहात  उपसमितीची सभा सकाळी १० ते ५ दरम्यान सभा होईल. योवळी समितीचे अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात (माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग), डॉ.विजय खोले (माजी कुलगुरु), डॉ.बाबुराव साबळे (माजी कुलगुरु), डॉ.नरेंद्र चंद्रा (माजी प्रकुलगुरु), प्रा.शितल देवरुखकर सेठ, डॉ.तुकाराम शिवरे व डॉ.धनराज माने (उच्च शिक्षण संचालक) आदी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय क्र.साविअ-२०२०/प्र.क्र.३७/विशि ४ दिनांक १९ ऑक्टोबर २०२० अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित केली आहे. सदर समितीच्या दिनांक ०३ नोव्हेंबर  रोजी झालेल्या सभेत विविध उपसमित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मुल्यांकन समिती या उपसमितीची सभा नाटयगृह येथे होणार  आहे. दिवभराच्या या बैठकीत दोन्ही विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, सहसंचालक डॉ.दिगंबर गायकवाड, डॉ.नलिणी टेंभेकर आदी उपस्थित राहणार आहेत. व्यवस्थापन परिषदेसह विविध अधिकार मंडळाचे सदस्यही यावेळी उपस्थित राहणार अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ.प्रताप कलावंत, कक्षाधिकारी डॉ.पंजाब पडूळ, आर.आर.चव्हाण यांच्याशी संर्पक साधण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages