फेसबुकच्या "कुलकर्णी देशपांडे जोशी" ग्रुपवर भीम अनुयायांना भिमटे म्हणणाऱ्या डोंबिवली चा युवक स्वरूप केळकर वर IPC section 295 व IT ACT section 66A नुसार गुन्हा दाखल . - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 29 January 2021

फेसबुकच्या "कुलकर्णी देशपांडे जोशी" ग्रुपवर भीम अनुयायांना भिमटे म्हणणाऱ्या डोंबिवली चा युवक स्वरूप केळकर वर IPC section 295 व IT ACT section 66A नुसार गुन्हा दाखल .

औंढा नागनाथ

आजकाल माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलेला आहे आणि त्याचा गैरवापर करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट फेसबुक सारख्या सोशल मीडियावर टाकणे किती महागात पडू शकते याची प्रचिती डोंबिवली च्या युवकाला आली.

 फेसबुकवर सातत्याने द्वेषपूर्ण पोस्टी असणाऱ्या ग्रुप पैकी "कुलकर्णी देशपांडे जोशी"  ग्रुपवर भीम अनुयायांना भिमटे असा जातियवादी उल्लेख करत गे गिरी करत आहे लवडे गिरी असे आक्षेपार्ह शब्द वापरले गेले.त्यानंतर त्याला काल पोलीस स्टेशन डोंबिवली स्टेशन मध्ये हजर करण्यात आले .नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष तसेच कायद्याचे शिक्षण घेणारे दादाराव नांगरे यांनी औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हा नोंद करण्यात आला.  दादाराव नांगरे यांनी दिलेल्या जवाबत म्हटले आहे की स्वरूप केळकर यांनी जाणीवपूर्वक पाणउतारा होईल अशा रीतीने डॉ भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल द्वेषपूर्ण विधान करून आक्षेपार्ह टिप्पणी केली .त्याचबरोबर भिमटे म्हणून सर्व लोकांसमोर अपशब्द वापरून समस्त बौद्ध तसेच भीम अनुयायी च्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे असेही तक्रारीत नोंद आहे .औंढा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवन्त मुंडे यांच्या मार्फत स्वरूप केळकर वर IPC section 295 व  IT ACT section 66A नुसार गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment

Pages