मुंबई :
संसदीय राजभाषा समितीच्या दुसर्या उपसमितीने आज मुंबईत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांच्या राजभाषा संबंधित कामकाजाची पाहणी केली.
लोकसभेचे सदस्य प्रा. रीता बहुगुणा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आज पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, आरईसी लिमिटेड, पश्चिम क्षेत्रीय भार प्रेषण केंद्र, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, रेल्वे भरती मंडळाच्या कार्यालयांची पाहणी केली.
समितीने राजभाषेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. ही समिती मुंबईनंतर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमधील कार्यालयांची पाहणी करेल.
No comments:
Post a Comment