नांदेड:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सलग्नीत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २० टक्के जागा वाढवण्यात याव्यात या मागणीचे निवेदन नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट या संघटनेने आज कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शैक्षणक वर्ष २०२०-२१ मध्ये पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात असून त्या मानाने पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जागा अतिअल्प असून पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या जागेमुळे पुढील शिक्षण घेणे कठीण होत आहे. त्यामुळे यावर्षीच्या पदवी उत्तीर्ण धारकांची अधिकची संख्या लक्षात घेता विद्यापीठातील संकुल व संलग्नित महाविद्यालयात २०टक्के जागा वाढवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हितसंवर्धन करण्यात यावे या मागणीसाठी नसोसवायएफ चे जिल्हा सचिव अक्षय कांबळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment