राजधानीत राष्ट्रीयमतदार दिवस साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 January 2021

राजधानीत राष्ट्रीयमतदार दिवस साजरा

नवी दिल्ली 25 : 11 वाराष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरा करण्यात आला.

आजमहाराष्ट्र सदनातील सभागृहात राजशिष्टाचार व गुंतवणुक आयुक्त निधी पांडे यांनी  राष्ट्रीय मतदार दिवसा‍निम‍ित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना ‘लोकशाहीवर निष्ठाठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण…………….. न पडता मताधिकाराचा वापर करू’अशी शपथ दिली.

याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीयमतदार दिवस साजरा

11वाराष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर, यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages