केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सुरक्षिततेत कपात केल्याने अकलूज प्रांत कार्यालयावर राज्यशासनाच्या विरोधात निदर्शने करन्यात आली.... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 January 2021

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सुरक्षिततेत कपात केल्याने अकलूज प्रांत कार्यालयावर राज्यशासनाच्या विरोधात निदर्शने करन्यात आली....


सोलापुर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, रामदासजी आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र शासनाने कमी केली आहे रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केली आहे यामुळे राज्यातील मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. रामदास आठवले हे हे गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात कोरोना covid-19 च्या प्रादुर्भाव मध्ये सुद्धा त्यांनी भारतभर दौरे करून गोरगरिबांच्या अडचणी सोडवले आहेत ते सध्या केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत त्यांच्या सुरक्षेत कपात करून त्यांच्या गाडीच्या मागील एस्कॉर्ट सुद्धा काढून घेतले आहे. आठवले साहेबांचे राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा  हा रडीचा डाव आहे. हा खोडसाळपणा मागासवर्गीय जनता खपवून घेणार नाही महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याविरोधात विरोधी पक्षात असलेले मंत्रीगण यांची सुरक्षा कपात केल्याचे दिसून येत आहे नियम सर्वांना समान असायला हवा तात्काळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नेहमीप्रमाणे झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्यशासनास नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी दिला आहे.

प्रास्ताविक एन.डी.एम.जे संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते भगवान भोसले यांनी केले त्यांनीसुद्धा राज्य शासनाचा निषेध करत रामदास आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे जोरदार मागणी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरस तालुक्याचे नेते रविराज बनसोडे  यांनीसुद्धा शासनाचा निषेध करून तीव्र आंदोलन छेडण्याचा मानस बोलून दाखवला यानंतर अकलूज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.महापुरुषांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय नारायण झेंडे,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,सतिश शिंदे,समीर नवगिरे,संजय नवगिरे व आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

इमेल-vaibhav10484

No comments:

Post a Comment

Pages