माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 15 January 2021

माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

 

     

मुंबई दि. 15  - माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम  कुठे थांबणार नाही. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे.रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही. असे  उत्स्फूर्त प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 


 जोगेश्वरी पूर्व येथील सारिपुत्त नगर येथे रिपाइं चे युवा जिल्हा अध्यक्ष  दिवंगत भरत पाईकराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वार कामानीचे उदघाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ना.आठवले बोलत होते. दिवंगत भरत पाईकराव हे रिपाइं चे युवा जिल्हा अध्यक्ष असताना गत वर्षी त्यांचे निधन झाला.त्यांच्या स्मृती जोपासण्यासाठी सरीपत्त नगर मधील रहीवासी आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केलेल्या संकल्पानुसर सारिपुत्त नगरचे  प्रवेशद्वार दिवंगत भरत पाईकराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले यासाठी ना. रामदास आठवले यांनी  कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 


दिवंगत भरत पाईकराव हे रिपाइंचे आणि रामदास आठवलेंचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे वडील दिवंगत चोखाजी पाईकराव हे मूळ चे रामदास आठवलेंचे भारतीय दलित पंथरपासून चे झुंझार कार्यकर्ते होते.त्यांचा वारसा भरत पाईकराव यांनी चालविला.आता भरत पाईकराव यांचे निधन झल्यानंतर त्यांचे सुपुत्र निखिल पाईकराव याने हाती रिपाइंचा निळा झेंडा घेऊन रामदास आठवलेंच्या नेतृत्वाला समर्थन देण्याचा वारसा सुरू ठेवला आहे.भारतीय दलित पँथर पासून दिवंगत चोखाजी पाईकराव; त्यांचा सुपुत्र भरत पाईकराव आणि आता भरत पाईकराव यांचा सुपुत्र  निखिल पाईकराव यांनी रिपाइं चा झेंडा हाती घेतला असल्याने तीन पिढ्यांनी ना. रामदास आठवलेंना आपले नेते मानून त्यांच्या वर जीवापाड प्रेम करण्याची परंपरा पाईकराव कुटुंबाने  सुरू ठेवली आहे. याची या विभागात चर्चा सुरू आहे. 


 रिपाइं चे सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; डॉ विजय मोरे ;जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; फुलचंद कांबळे;ऍड.अभया सोनवणे; रमेश गायकवाड; रतन अस्वारे; चंद्रकांत पाटील; भीमराव सवातकर; सुनील बोर्डे;  उषाताई रामळू; गायिका वैशाली शिंदे तसेच दिवंगत भरत पाईकराव यांच्या मातोश्री रेशमाबाई चोखाजी  पाईकराव; पत्नी राजश्री भरत  पाईकराव; तसेच पुत्र निखिल भरत पाईकराव;  कन्या नितु आणि श्रुती पाईकराव सह सर्व  पाईकराव परिवार उपस्थित होते. 


 भारतीय दलित पँथर ही संघर्षमय चळवळ होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात भारतीय दलित पँथर च्या नेतृत्वात तरुणांचे थवे च्या थवे मुंबईत मोर्चात येत असत. याची आठवण ना रामदास आठवले यांनी यावेळी सांगितली.  दिवंगत भरत पाईकराव आणि त्यांचे वडील चोखाजी पाईकराव हे अत्यंत लढाऊ पँथर होते.या दोघा पिता पुत्रांनी मला साथ दिल्याची भावना ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. 

मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीने झोपड्यांना अभय देण्याचे काम आम्ही केले. झोपड्यांच्या जागी आता एसआरए मुळे इमारती उभ्या राहिल्या आहेत. एसआरए योजनेत 550 फूट बिल्ट अप एरिया चे घर द्यावे ही रिपाइं ची मागणी असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.


                 

No comments:

Post a Comment

Pages