भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून दक्षता घ्यावी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 January 2021

भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून दक्षता घ्यावी- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि. 9 - भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु युनिट ला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यु झाल्याची मन विदीर्ण करणारी दुःखद घटना घडली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. राज्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी शासनाने दक्षता घ्यावी त्यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.


 या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या  नवजात अर्भकांच्या पालकांना सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.  भंडारा जिल्हा रुग्णालय अग्निकांडात दहा नवजात बालकांचा  मृत्यू होणे ही काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुःखद घटना आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच या दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून दक्षता घ्यावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. 


                   

No comments:

Post a Comment

Pages