औरंगाबाद :
नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन सेनेच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सकाळी तातडीने बैठक घेत रिपब्लिकन सेनेची भूमिका समजून घेतली.
ह्यात प्रामुख्याने गर्दी टाळण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले परंतु गर्दी चे योग्य नियोजन करावे,अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व आंबेडकरी नेत्यांच्या वेळेचे सुयोग्य नियोजन करावे,शासकीय चौकटीत (प्रोटोकॉल मध्ये) बसवून हा कार्यक्रम घ्यावा,बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची अडवणूक होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी,नामांतर शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करावा,पार्किंग,पिण्याचे पाणी,अभिवादन सभेसाठी कोरोनाच्या सूचना देऊन परवानगी द्यावी व ह्याचे नियोजन करण्यासाठी तातडीने सर्व आंबेडकरी नेते कार्यकर्त्यांची बैठक बोलवावी अश्या आग्रही सूचना मांडली.
त्यानुसार दि.११ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडणार आहे.
No comments:
Post a Comment