औरंगाबाद महानगरपालिका स्वबळावर लढणार - डॉ.सिद्धांत गंगाधर गाडे, युवा अध्यक्ष - पँथर्स रिपब्लिकन पार्टी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 January 2021

औरंगाबाद महानगरपालिका स्वबळावर लढणार - डॉ.सिद्धांत गंगाधर गाडे, युवा अध्यक्ष - पँथर्स रिपब्लिकन पार्टीऔरंगाबाद :

पँथर्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष मा.मंत्री गंगाधर गाडे. या पक्षाच्या शहर व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आगामी होणाऱ्या महानगरपालिका संदर्भात जिल्हा अध्यक्ष साहेबराव नवतुरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली, यात पक्षाचे युवा अध्यक्ष डॉ. सिद्धांत गंगाधर गाडे, औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर प्रकाश दादा निकाळजे, अनिल मगरे, राकेश साबळे, करण कल्याणी, किशोर गायकवाड, संदीप काळे, मधुकर नगराळे, मारुती गायकवाड, प्रवीण गाडेकर, राजू गायकवाड,सुनील मगरे, ज्ञानेश्वर खरात, महिला जिल्हाध्यक्षा सौ.अनिता उबाळे, लताताई थोरात, सावित्रीबाई साळवे, यादी. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी बोलतांना डॉ.सिद्धांत गाडे म्हणाले आम्ही एकूण 115 जागेवर तयारी केली असून तोडीस तोड उमेदवार देणार आहोत, आमची यादी तयार असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत, जिंकू किंवा पाडू हे आमची भूमिका आहे, तरीही समविचारी पक्षाने आमच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला व आमचा योग्य सन्मान केला तर आम्ही त्यांचा देखील विचार करू असे डॉ.सिद्धांत गाडे म्हणाले, यावेळी सूत्रसंचालन आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष साहेबराव नवतुरे यांनी केले, लवकरच राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ.सूर्यकांता गंगाधर गाडे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.निवृत्ती आरु,यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीरनामा समिती गठीत केली जाईल असे जिल्हाध्यक्ष साहेबराव नवतुरे म्हणाले, या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पँथर्स रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश केला.

No comments:

Post a Comment

Pages