आर.पी. एफ. कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय कार्य - सचखंड एस्क्प्रेस मध्ये सापडलेल्या दोन्ही मुलांच्या पालकांचा शोध लावला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 January 2021

आर.पी. एफ. कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय कार्य - सचखंड एस्क्प्रेस मध्ये सापडलेल्या दोन्ही मुलांच्या पालकांचा शोध लावला

नांदेड :

गाडी सख्या 02716 अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्सप्रेस मध्ये ड्युटी वर असतांना श्री प्रमोद कुमार, तिकीट चल निरीक्षक, नांदेड यांना दोन मुले डी-1 कोच मध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळले, अधिक चौकशी केली असता ते या गाडीने झोपे मध्ये पुढे आले असल्याचे लक्षात आले. श्री प्रमोद कुमार यांनी दोन्ही मुलांना औरंगाबाद येथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या उप-निरीक्षकांच्या स्वाधीन केले. आर.पी.एफ. औरंगाबाद  यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या वडिलांचा नंबर सापडला. मुलांचे वडील श्री राकेश कुशवाह यांच्याशी मोबाईल वर बोलणे झाले असता हि मुले श्री कुशवाह याच्या सोबत  ललितपुर येथून इंदोर ला जाण्यासाठी  प्रवास करत असल्याचे लक्षात आले. श्री राकेश कुशवाह हे बिना रेल्वे स्टेशनवर पाणी घेण्यासाठी खाली उतरले आणि बाटलीत पाणी भरण्यात मग्न होते  तोच सचखंड एक्सप्रेस पुढील प्रवासास निघून गेली. हे दोन्ही मुले  झोपित असाल्यामुळे पुढे आली.  या मुलांचे नाव अरुण वय- 9  वर्ष व अभिषेक वय- 6  वर्ष अशी आहेत. नियमानुसार दोन्ही मुलांना बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या समोर पुढील कार्यवाही करिता  सादर  केले. 


मुलाचे वडील श्री राकेश कुशवाह हे आपल्या मुलांना घेण्याकरिता आज सकाळी औरंगाबाद येथे हजर झाले. 


श्री कुशवाह यांनी श्री प्रमोद कुमार, तिकीट चल निरीक्षक, नांदेड, श्री अरविंद शर्मा, पोलीस निरीक्षक/ आर.पी.एफ., औरंगाबाद आणि संपूर्ण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. 



No comments:

Post a Comment

Pages