नामविस्तार दिन सोहळ्याबाबत पोलीस व जिल्हाप्रशासन उदासीन प्रशासनाने पुढाकार घेऊन नियोजन करावे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 January 2021

नामविस्तार दिन सोहळ्याबाबत पोलीस व जिल्हाप्रशासन उदासीन प्रशासनाने पुढाकार घेऊन नियोजन करावे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणीऔरंगाबाद:
नामविस्तार दिनाचा 27 वा वर्धापन दिन दि.१४ जानेवारी रोजी असून राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी ह्या सोहळ्यास उपस्थित राहून नामांतर शहिदांना अभिवादन करतात तसेच रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर व राज्यभरातील सर्व प्रमुख आंबेडकरी नेते अभिवादन सभा घेऊन नामांतर शहिदांच्या बलिदानास वंदन करतात.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे शासनाचे निर्देश दिले आहेत परंतु चैत्यभूमी व भीमकोरेगाव येथे दरवर्षी प्रमाणे लाखो अनुयायी अभिवादनासाठी येणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक जिल्हाप्रशासन यांनी पुढाकार घेऊन स्थानिक आयोजक व नेते कार्यकर्ते यांच्या सूचना लक्षात घेऊन सुयोग्य पद्धतीचे नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला तेथे भीमराव आंबेडकर,आनंदराज आंबेडकर व राज्यातील प्रमुख नेत्यांनी व आंबेडकरी अनुयायांनी शूरवीरांना मानवंदना दिली.
त्याच धर्तीवर आंबेडकर अनुयायी व नेत्यांची उपस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना विचारात घ्याव्या व कोविड च्या सूचनांच्या अधीन राहून अभिवादन सभांना परवानगी द्यावी,प्रशासनाकडून कार्यक्रमाचे नियोजन करावे तसेच संभाव्य गर्दी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करावे.
जिल्हाप्रशासन ,पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायी यांच्या समन्वयातुन शिस्तबद्ध अश्या स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा अश्या मागणीचे निवेदन आज रिपब्लिकन सेनेचे वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांना देण्यात आले.
यावेळी सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे,महेंद्र तांबे,गुरू कांबळे,विशाल इंगोले,गोलू गवई, वैभव इंगोले,प्रबोधन बनसोडे, अविनाश कांबळे,सागर प्रधान आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages