नांदूर शिंगोटे येथे भव्य बुद्धविहाराचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 23 January 2021

नांदूर शिंगोटे येथे भव्य बुद्धविहाराचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण


 मुंबई दि. 23 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता तर हिंदू धर्मातील विषमतेला;जातीभेदाला विरोध होता.जातीभेद नष्ट होण्यासाठीच बौद्ध धम्मा ची स्थापना झाली असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला.धम्म चक्र प्रवर्तित केले असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.


नाशिक च्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे या गावात ना रामदास आठवले यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे लोकार्पण आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे;माजी आमदार राजाभाऊ वाजे; रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर;जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे;शिवाजीराव ढवळे; उदय सांगळे; नाशिक च्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई  सांगळे; नाशिक युवा जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे; राजेश गडाख;बाळासाहेब सराफ; मंगेश जाधव;गुंफाताई भंदर्गे; मनाली जाधव;चंद्रशेखर कांबळे  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 


भगवान बुद्धांचा धम्म हा बहुजन हिताय बहुजन सुखाय चा विचार सांगत जगात पहिला खरा  लोकशाहीचा विचार सांगणारा धम्म आहे.विज्ञान शिकविणारा; शांती अहिंसा सत्य आणि सम्यक मार्ग दाखविणारा बौद्ध धम्म आहे. मानतील अहंकार नष्ट करून मन शांत आणि शुद्ध ठेवणे ठेवण्याचे संस्कार बौद्ध धम्मातून मनावर होतात. मी मनाने आहे शुद्ध म्हणून आहे मी बुद्ध असे  यावेळी ना. रामदास आठवले म्हणाले.  एकमेकांवर टीका न करता  मी  राजकारण करीत आहे.माझा पक्ष कसा चांगला ते सांगताना मी इतरांवर  टीका करीत नाही असे ना रामदास आठवले म्हणाले.उदय सांगळे यांनी अत्यंत चांगली संकल्पना मांडून सुंदर बुद्ध विहार उभारल्या बद्दल त्यांचे ना रामदास आठवले यांनी कौतुक केले. 


                

No comments:

Post a Comment

Pages