संथागार वृध्दाश्रमात सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 January 2021

संथागार वृध्दाश्रमात सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा

किनवट :

येथील संथागार वृद्धाश्रमात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीमाई फुले  यांचा १९० वा जयंती सोहळा पार पडला.जयंती औचित्याने  युवा व्याख्याते अतुलराज बेळीकर यांचा प्रबोधनपर व्याख्यानाच आयोजन करण्यात आल होत .

यावेळी युवा व्याख्याते अतुलराज बेळीकर बोलतांना म्हणाले की, जिच्या हातात पाळण्याची दोरी होती , चूल आणि मूल पूरती  मर्यादित असलेल्या हातात आज क्रांतीची पेन देऊन विद्रोहाचा एल्गार करणाऱ्या स्त्री मुक्तीच्या आद्यप्रवर्तक ह्या क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले होतात...


आ.भीमराव केराम तसेच ज्योतिबा खराटे यांनी सावित्रीमाई  फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.


    कार्यक्रमाच्या      अध्यक्षस्थानी आ. भीमराव केराम होते तर विशेष उपस्तिथी  म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा खराटे होते. मारोती भरकड, दत्ता आडे, संतोष मरसकोल्हे ,संगीताताई पाटील, भिमराव केराम,  जोतिबा खराटे,  बालाजी मुरकुटे, वाडगुरे सर, राजकुमार बाविस्कर , राजू पेटकूले, संजय गुरनुले, संदिप पेटकुले, पांडुरंग गुरनूले,

    ,डॉ.पंजाब शेरे , शंकर नगराळे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविक संथागार वृध्दाश्रमाचे संचालक अरुण आळणे यांनी केले.सुत्रसंचालन संथागार वृध्दाश्रमाच्या अधिक्षक आकांक्षा आळणे ह्यांनी केले  तर आभार राजेश पाटील यांनी मानले.

                   कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, माजी नगरसेविका करुणा आळणे , अजिंक्य आळणे यांनी परिश्रम घेतले .



No comments:

Post a Comment

Pages