नागपुर:
महाराष्ट्र रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत मागील सात वर्षांपासून घर बांधणकरिता समाज कल्याण विभागाद्वारे रू.2.50 लक्ष देण्यात येत आहेत. सदर रक्कम ही आज वाढत्या महागाई निदेशांकानुसार अत्यल्प असल्याकारणे बांधकाम पूर्ण करण्यास ब-याच आर्थिक अडचणींचा सामना आर्थिक दृष्टया दूर्बळ असलेल्या लोकांना करावा लागत आहे. सदरहू रकमेत मागील सात वर्षांपासून कोणत्याच प्रकारचा बदल अद्यापही शासन-प्रशासनाद्वारे करण्यात आलेला नाही. वाढलेल्या महागाईमुळे सदर रक्कम ही अपुरी पडत असल्याने लाभाथ्र्यांना त्याचा बोझा सहन करावा लागत आहे. करिता महाराष्ट्र रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता देण्यात येणारी रक्कम आजचे आर्थिक धोरण तसेच महागाई निदेशंकास अनुसरूण रू.2.50 लाखावरून 4 लाख रूपये वाढीव दराने तात्काळ देण्यात यावे यासंदर्भात मा. उपायुक्त मार्फत मा. मंत्री, धनंजय मुंडे, मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आयुक्त, समाज कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना मंचचे सदस्य आशिष फुलझेले, सुमीत कांबळे, रतन वाहाने, मुकेश मेश्राम, धर्मपाल गोंगले, सिद्धार्थ बन्सोड, आशिष तितरे, संदीप वाघमारे, अमीत मेंढे, अमीत सिंग आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment