नांदेड - बौद्ध आणि मराठा समाजात अनेक बाबींत साम्य आढळते. काही भिन्न मुद्द्यांवरून दोन्ही समाजात तेढ निर्माण केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, जीवनकार्य डोळसपणे अभ्यासून समजून घेतल्याने माणसाची केवळ प्रगतीच नाही तर उत्कर्ष होऊ शकतो. समाजापुढे अनेक प्रश्न आहेत, संघर्षही अविरत चालू आहे. वैचारिक परिवर्तनाची लढाई एकत्रित लढू या अशी हाक मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश पवार यांनी शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपाचे माजी उपायुक्त प्रकाश येवले, प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण उपसभापती ज्योत्स्नाताई गोडबोले, रमेशभाऊ गोडबोले, साहित्यिक गंगाधर ढवळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, गयाताई कोकरे, मिलिंद शिराढोणकर, संजय वाघमारे, अॅड. नितीन थोरात आदींची उपस्थिती होती.
Thursday 25 February 2021
Home
जिल्हा
वैचारिक परिवर्तनाची लढाई एकत्रित लढू या! मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश पवार यांचे प्रतिपादन ; प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
वैचारिक परिवर्तनाची लढाई एकत्रित लढू या! मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश पवार यांचे प्रतिपादन ; प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment