मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना ‘पेटंट‘ जाहीर -सलग दुस-या वर्षी पेटंटचा बहुमान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 February 2021

मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना ‘पेटंट‘ जाहीर -सलग दुस-या वर्षी पेटंटचा बहुमान


औरंगाबाद,दि.२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना औषधनिर्माणशास्त्र विषयातील संशोधनाबद्दल ‘इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया‘ यांच्या वतीने पेटंट जाहीर करण्यात आले आहे. कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ.प्रमोद येवले यांना हे दुसरे पेटंट जाहीर झाले असून आणखी ‘पाच पेटंट‘साठीचे प्रस्ताव यापुर्वीच दाखल करण्यात आलेले आहेत. ‘एड्स‘वर उपचारासाठी वापरण्यात येणा-या औषधीत या संशोधनाचा वापर होणार आहे.


    या संदर्भात भारत सरकारच्या ‘पेटंट कार्यालयाचे नियंत्रक यांनी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ.प्रमोद येवले यांना पेटंट प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्राद्वारे घोषित केले आहे. या कार्यालयाकडे ‘सिंथेसिस ऑफ चितासन ग्राफ्ट एचपीबीसीडी कोपोलायमर बाय वन पॉट सिंथेसिस टेक्निक फॉर सॉल्यूबिलिटी एन्हान्समेंट ऑफ ऑपेवेरिनेज्‘ या औषधनिर्माणशास्त्रातील संशोधनाबद्दल पेटंटसाठी ७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्तावास पेटंट कार्यालयाने २४ फेब्रुवारी २०२१ मान्यता दिली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ.आरती व्ही.बेलगमवार व डॉ.शगुफ्ता ए खान यांनीही या पेटंटसाठी संशोधन कार्य केले आहे. सदर पेटंटचे राईटस् वीस वर्षासाठी असणार आहेत. ‘एड्स‘ संदर्भात वापरण्यात येणा-या औषधीत या संशोधनाचा वापर होणार आहे. या औषधीची ‘सॉल्युबिलीटी‘ वाढविण्यासाठी सदर संशोधन महत्वपूर्ण ठरणार आहे.


 *सलग दुस-या वर्षी पेटंट*   


 कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना  ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया‘ यांचे पेटंट नियंत्रक यांनी ११ मार्च २०२० रोजी पेटंट घोषित करण्यात आले होते. ‘प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ इंट्रनल इफाविटेन्झ नॅनो पार्टीकल्स फॉर सीएनएस टार्गेरिंग इन न्युरो एडस‘ या विषयापरील संशोधनास पेटंट म्हणून गेल्या वर्षी मान्यता दिली. ७ डिसेंबर २०१६ रोजी नोंदविण्यात आलेला या पेटंटचा कालावधी आगामी वीस वर्षांसाठी असणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यापुर्वीच पाच पेटंटस् फाईल केलेले आहेत. डॉ.येवले हे १६ जुलै २०१९ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कार्यरत आहेत. गेल्या दीड वर्षात ‘एपीटीआय‘चा जीवन गौरव पुरस्कार, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या उपसमितीवर ते कार्यरत आहेत. ‘पेटंट‘ प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, माजी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.


   *‘आयपीआर‘सेल सक्षम बनविणार : कुलगुरु*


    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर  दुस-यांदा पेटंट प्राप्त झाले ही आनंदाची गोष्ट आहे. मराठवाडयातील संशोधक व प्राध्यापकांमध्ये संशोधनवृत्ती व चिकाटी मोठया प्रमाणावर आहे. त्याना योग्य ते मार्गदर्शन व संधी मिळाल्यास त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. तसेच विद्यापीठातील शोधनिबंध, संशोधन कार्य अधिक दर्जेदार व समाजपयोगी व्हावे यासाठी ‘इंटेलेकल्च्युअल प्रॉपर्टी सेल‘ला आणखी सक्षम बनविण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages