कहाळा खुर्द सरपंच पदी बहिरवाड जयश्री रामकीशन व उपसरपंच पदी संगम शिंदे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 13 February 2021

कहाळा खुर्द सरपंच पदी बहिरवाड जयश्री रामकीशन व उपसरपंच पदी संगम शिंदे

 नायगाव :

कहाळा खुर्द येथील ग्रामपंचायतीवर श्री. रावणराव भाऊराव पा.शिंदे व श्री.साईनाथ बाबाराव पा.हेंडगे यांच्या  महारुद्र ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवत सरपंचपदी सौ. जयश्री रामकिशन बहिरवाड व उपसरपंचपदी श्री.संगम आनंदराव पा.शिंदे यांची निवड करीत ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला.

 एकूण नऊ सदस्य असलेल्या कहाळा खुर्द  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महारुद्र ग्राम विकास पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये सौ.प्रयागबाई रावणराव पा.शिंदे, सौ.भागरथबाई विठ्ठलराव पा.जाधव, सौ.राधाबाई हनमंत पा. कारताळे, सौ.जयश्री रामकिशन बहिरवाड, श्री.संगम आनंदराव पा. शिंदे हे उमेदवार विजयी झाले आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये महारुद्र ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदी सौ.जयश्री रामकिशन बहिरवाड यांची निवड झाली  तर उपसरपंचपदी  श्री.संगम आनंदराव पा.शिंदे यांची निवड झाली.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  सौ.संध्या मांजरमकर  यांनी काम पाहिले, निवडीसाठी ग्रामसेवक  श्री .कदम साहेब  तलाठी सौ.रायबोले मॅडम पोलिस हेडकॉन्स्टेबल  निखाते सर कहाळा खुर्द पोलीस पाटील  संतोष पुरजवार ग्रामपंचायत ऑपरेटर  गजानन हेंडगे आदींनी सहकार्य केले.

तसेच श्री गंगाराम पा.वडजे,दादाराव पा.जाधव  नामदेव पा. शिंदे

बाबाराव पा हेंडगे, रावण मारोती चिकलवाड, प्रभाकर पा. मेघळ हणमंत पा. कारताळे,रामकिशन पुरजवार,सोनाजी पा हेंडगे , मनोहर पा.शिंदे, राजाराम नुकुलवाड, दत्ता चिकलवाड संगम पा शिंदे,ज्ञानेश्वर पा शिंदे,आनंद शिंदे, गणेश नरवाडे, आनंद पा.हेंडगे, राहुल पा.कारताळे,शिवाजी नागोराव बहिरवाड, बालाजी रावण चिकलवाड

बापूराव पा.मेघळ, निळकंठ कल्याणकर, प्रकाश कारताळे  अनिल पवार गौतम राक्षसमारे बालाजी गजभारे यांनी पॅनल विजयासाठी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Pages