विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रध्यापक भरती बाबत मागणी -नसोसवायवाफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 13 February 2021

विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रध्यापक भरती बाबत मागणी -नसोसवायवाफ

नांदेड : 

विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रध्यापक भरती बाबत मा.उदय सामंत,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,महाराष्ट्रा राज्य यांना एक निवेदन देण्यात आले, तसेच कोव्हिड-१९ च्या तालेबंदीत जे विद्यार्थी हिताय निर्णय घातले आहेत त्या निर्णयाचे नसोसवायएफ  संघटनेकडून स्वागत करून व आभारही व्यक्त मा. शिक्षण मंत्री यांचे केले. 

         राज्यात प्राध्यापक भरती ही पुर्णत्ता भ्रष्ट पध्दती ने होते. आज सह्योगी प्राध्यापक म्हणून निवड करायची असेल तर पात्र विद्यार्थ्यांना 40 लाख  रुपये संस्थाचालकांना मोजावे लागतात .यातून योग्य व पात्र आणि होतकरु गरीब विद्यार्थ्यांची पैश्या अभावी निवड होत नाही.या पद्धतीचा भ्रष्ट भरती प्रक्रियेचा आम्ही विरोध नसोसवायएफ संघटना करते, तसेच केंद्रीय पद्धतीने प्राध्यापक भरती प्रक्रिया आपण राबवण्याचा शासनाने निर्णय घ्यावा. तसेच शिक्षा मंत्रींनी राज्यभरातील विद्यापीठामध्ये पदवी व पदवी उत्तीर्ण सामाईक परीक्षा पद्धतीचा अवलंब करतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही.त्यामुळे राजभरातील  विद्यापीठामध्ये वार्षिक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

           तसेच मा.उदय सामंत विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र आहे त्यामुळे राज्यातील विद्यापीठात एम. फील.  हा अभ्यासक्रम बंद करण्यात येऊ नये.तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एम फिल प्रवेश परीक्षा ज्या पद्धतीने करण्यात आली त्याच धर्तीने प्रत्येक विषयाला २०-२०जागा देण्यात आल्या त्याच पद्धतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्याही जागा वाढवून प्रवेश प्रक्रिया करण्यात यावी.

तसेच महोदय २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पदवीच्या अंतिम वर्षातील  विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या ही अधिक आहे.तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ह्या अपुऱ्या आहेत त्या वाढविण्यात  याव्या. आणी 

प्राध्यापक भरती ही केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी,सामाईक परीक्षा रद्द करून राज्यातील विद्यापीठामध्ये वार्षिक परीक्षा पद्धती घेण्यात यावी,एम फील या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विषयाच्या जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धर्तीवर २०-२०या पद्धतीने वाढवण्यात यावी,स्वारातीम  विद्यापीठातील सामाजिक शात्र्ये संकुलातील एम एस डब्लु अभ्यासक्रमाची एक तुकडी या शैक्षणिक वर्षांसाठी वाढवण्यात यावी

वरील मागण्या नँशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट (नसोसवायएफ) संघटने मा. उदय सामंत यांना देऊन  विद्यार्थ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त केले आहे. हे निवेदन देऊन चर्चे मध्ये डॉ.डी. हर्षवर्धन (राष्ट्रीय अध्यक्ष)

प्रा. सतीश वागरे(राज्य प्रवक्ता)संदीप जोंधळे(जिल्हा प्रभारी)अक्षय कांबळे

(जिल्हा सचिव)मनोहर सोनकांबळे

(जिल्हा प्रवक्ता) हे विद्यार्थी  नेते होते.

No comments:

Post a Comment

Pages