नांदेड - वसरणी येथील युवा कार्यकर्ते शुद्धोधन कापसीकर यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या वतीने 123 व्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सुजाता बुद्ध विहार येथे अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी बक्षीस वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगरसेविका दिपाली मोरे हे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ईरवंत गायकवाड सर, विलास काळे, संभाजी खराणे, चंद्रभागा कापसीकर, सुधाकर पोवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निबंध स्पर्धेत एकूण 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये छोट्या गटात प्रथम पारितोषिक आर्णवी वाघमारे तर द्वितीय रोहिनी जोंधळे, मोठ्या गटात प्रथम पारितोषिक संघकार कांबळे तर द्वितीय अपूर्वा पोवळे व खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक महेश गजभारे व द्वितीय पारितोषिक पुनम कांबळे यांना मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आयोजक शुद्धोधन कापसीकर यांनी केले सूत्रसंचालन पवन कदम यांनी केले. यावेळी अनिता गजभारे, गौतम पोवळे, दीपा कांबळे, अनिकेत गजभारे, अमित पोवळे, यशस पोवळे, राजू गजभारे, राम पोवळे,अरुण पोवळे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment