एम.फिल. प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने जलद गतिने करण्यात यावी -नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 18 February 2021

एम.फिल. प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने जलद गतिने करण्यात यावी -नसोसवायएफ


 नांदेड;दि.१८

            स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील एम.फिल. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्या विषयी नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट च्या वतीने मा.कुलुगुरु यांना प्रा.सतिश वागरे (राज्य प्रवक्ता) व संदिप जोंधळे (जिल्हा प्रभारी) यांनी निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातील एम.फिल. प्रवेश प्रक्रिया सुरु व्हावी. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र आहे त्यामुळे विद्यापीठांतर्गत शोधकर्ता अधिक असणे गरजेचे आहे. हे आपणास ठाऊक आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद व पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी विद्यापीठ स्तरावर एम.फिल. या विषयासाठी २०-२० जागा प्रती विषयी काढल्या आहेत,म्हणून त्याच धर्तीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, तसेच प्रत्येक विषयात २०-२० जागांसाठी ची प्रवेश प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. पुढे निवेदनात काही मागण्या नसोसवायएफ संघटनेच्यावतीने मांडण्यात आल्या त्यात प्रथमतः एम.फिल. प्रवेश प्रक्रिया जाहिरात त्वरित करण्यात यावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर ज्या पद्धतीने जागेचे वितरण प्रती विषयानिहायक २०-२० जागा त्या पद्धतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्ये करण्यात याव्या तसेच ह्यूमन राईट विषय विद्यापीठाने सुरू केले होते या विषयात मुबलक प्रमाणात विषय मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन नसोसवायएफ संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment

Pages