बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला- प्रदीप नाईक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 19 February 2021

बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला- प्रदीप नाईक

 


किनवट, दि.१९ : जगण्यासाठी वणवण भटकंती करणार्‍या व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गात असणार्‍या बंजारा समाजाला  संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे ही सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी २५० वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी ह्या आताच्या काळातसुद्धा तंतोतंत लागू पडत आहेत. त्यामुळेच आज ते सर्व बंजारा समाजाचे श्रद्धेय असे आराध्यदैवत ठरले आहेत, असे प्रतिपादन माजी आ.प्रदीप नाईक यांनी केले.


       गोकुंदा येथील सेवालाल महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या संत सेवालाल महाराजांच्या २८२ व्या जयंतीच्या कार्यक्रमात महाराजांना भोग चढवून आरती झाल्यानंतर ते जमलेल्या सर्व समाजबांधवांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक  व्यक्तीने सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या उपदेशाचा आदर करीत आचरण केले तरच समाज प्रगतीच्या शिखरावर पोहचेल. येत्या काळात किनवट तालुक्यात बंजारासह सर्वच जातीतील असाहाय्य वृद्धांना आधार देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त वृद्धाश्रम उभारण्याचा मानस व्यक्त करून, गोकुंदा येथील नियोजित सेवालाल मंदिरात सभामंडप उभारण्याचा ही संकल्प व्यक्त केला. याच कार्यक्रमात कॉ.अर्जुन आडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या जयंती निमित्त किनवट येथे घेतलेल्या रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला तर सारखणी येथे दरवर्षीप्रमाणे भव्य लेंगी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिथे ‘सैराट’ मधील नायिका रिंकू राजगुरू (आर्ची) या अभिनेत्रीने हजेरी लावल्यामुळे, अलोट गर्दीत हा समारंभ भव्यदिव्य ठरला.


        या जयंती सोहळ्यासाठी मदनापूर येथील सोमेश्वर शिवमंदिराचे महंत श्री गंगेश्वर महाराज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, रा.काँ.चे ता.अध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, माजी जि.प.बंडु नाईक, बाजार समितीचे सभापती अनिल कर्‍हाळे, उपसभापती श्रीराम कांडे,  वैजनाथ करपुडे, गटनेते जहिरोद्दीन खान, माजी नगराध्यक्ष साजिद खान, नगरसेवक प्रविण राठोड, डॉ.रोहिदास सकरु जाधव, कुंदन पवार, प्रा.खुपसे, प्रा.परशुराम जोशी माहुर, शेख सलिम, पांडुरंग राठोड, कचरु जोशी, पंडित राठोड,  हाजी युसुफ, सरपंच प्रेम जाधव, रामराव जाधव,  गंगारेड्डी बैनमवार, सतिष नाईक मोहन जाधव, सुभाष बाबु नाईक, यांच्यासह बंजारा समाजातील पारंपारीक नृत्य सादर करणारे समूह, महिला व मोटारसायकल रॅलीद्वारे जयंतीसमारोहात जोरदार प्रवेश करणारे युवकांचा समुह उपस्थित होते.


      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रा.यु.कॉ.चे राहुल गेमसिंग नाईक, महेश गोविंद तंबाखुवाला, कैलास जाधव, गोर कैलास, गणेश राठोड, वसंत राठोड, महाविर आडे यांच्यासह अनेक युवकांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages