लता पाटील तौर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आश्विनी, प्रीतीचा पारितोषिक देत गुणगौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 February 2021

लता पाटील तौर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आश्विनी, प्रीतीचा पारितोषिक देत गुणगौरव

 वारोळा (ता. माजलगाव) येथील आश्रमशाळेत दिवंगत मुख्याध्यापिका लता पाटील तौर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, वारोळा (ता. माजलगाव) येथील आश्रम शाळेतून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनी गोपीनाथ काळे, प्रीती सर्जेराव क्षीरसागर यांची प्रत्येकी ५००१ रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच स्मृतिदिनानिमित्त मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान पार पडले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. के. तौर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. हमराज उइके, प्रा. श्याम मुढे, प्रा. जे. बी. पांचाळ, डॉ. रामप्रसाद तौर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. पी. कचरे यांनी केले. सूत्रसंचालन यू. ए. राऊत यांनी, तर आभार बी. एन. मिसाळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages