राजधानीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 15 February 2021

राजधानीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी

              

नवी दिल्ली, 15 : संत सेवालाल महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली. 

  कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणुक आणि राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे  यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

      महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली.  यावेळी स्वतंत्र पत्रकार निवेदिता खांडेकर आणि उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment

Pages