RTE 25% प्रवेश प्रक्रिया नियमित शाळा सुरू होणे अगोदर पूर्ण करण्यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचचे शिक्षणाधिकारी नागपूर यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 February 2021

RTE 25% प्रवेश प्रक्रिया नियमित शाळा सुरू होणे अगोदर पूर्ण करण्यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचचे शिक्षणाधिकारी नागपूर यांना निवेदन

RTE 25% अंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया ही मार्च महिन्यात पूर्ण होते. एप्रिल महिन्यात प्रशासनाद्वारे लॉटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केल्या जाते.  बऱ्याच विद्यार्थ्यांना या न त्या कारणाने प्रवेश मिळत नाही म्हणून त्या जागा शिल्लक राहतात. शिल्लक असलेल्या जागेत वेटिंग वर असलेल्यांची निवड करण्यात येते. ही प्रक्रिया तब्बल 6 महिने 6 राऊंड मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत चालत असते. मागील 5 वर्षांपासून ते आजतागायत हा प्रकार निदर्शनास येत आहे. सहसा शाळा जुन महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात सुरू होते. RTE 25% अंतर्गत वेटिंग लिस्ट मध्ये नाव असणाऱ्या पाल्यांच्या पालकांना शाळा सुरू झाल्यामुळे नाईलाजाने वेळ काळ लक्षात घेता मिळेल त्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.


सामान्यपणे शिक्षण विभाग शाळा जुन महिन्यात सुरू करण्याचे आदेश देत असते. असे असताना शिक्षण विभाग RTE 25% अंतर्गत प्रवेश प्रक्रिया 6 महिने राबवून पाल्य आणि त्यांच्या पालकांवर एक प्रकारचा अन्याय करत आहे. गरीब शोषित पीडितांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव शिक्षण विभागाद्वारे खेळल्या जात आहे.


RTE 25% प्रवेश प्रक्रिया ही शाळा सुरू होण्या अगोदर म्हणजेच जून महिन्याआधी पूर्ण करण्यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचने मा. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना शिक्षणाधिकारी नागपूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना ऍड. राहुल तेलंग, आशिष फुलझेले, संदीप वाघमारे, आकाश खोब्रागडे, राकेश सोनूले, निलेश भिवगडे, मुकेश मेश्राम, अमित मेंढे, नीरज रंगारी आदी उपस्थित होते


No comments:

Post a Comment

Pages